सभासदत्व घेतलेल्या सभासदांची कच्ची / पक्की यादी.
परिशिष्ट क्र. 1
सानिका सहकारी गृहनिर्माण
संस्था म. (नोंदणी क्र. तारीख /2019)
नोंद पुस्तकातील या संस्थेच्या सभासदांनी
दि.31 डिसेंबर / 30 जून अखेरपर्यंत सभासदत्व घेतलेल्या सभासदांची कच्ची / पक्की
यादी.
अ. क्र.
|
सभासदांचे नोंदपुस्तकातील (आय
नमुन्यातील अ.क्र.)
|
सभासदांचे नाव सदनिका/घर क्र.
|
सभासदत्व दिल्याची तारीख
|
धारण केल्यापैकी पूर्ण भरणा
केलेल्या भागांची संख्या
|
शेरा
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
1
|
|||||
परिशिष्ट क्र. 12
(उपविधी क्र. 24 व 74 (अ)
अन्वये)
संस्थेच्या सभासदास द्यावयाच्या
गाळा / भूखंड वाटप पत्राचा नमुना
प्रति,
श्री/श्रीमती/मेसर्स
महाशय,
महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम 1960 मधिल तरतुदीनुसार सहाय्यक निबंधक / उपनिबंधक /
सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी नोंदलेली
किंवा नोंदली गेली असे मानली जाणारी सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म.(नोंदणी
क्र. तारीख /2013) यांचे आपण सभासद आहात.
2) ---- चौरस
मीटर्स क्षेत्रफळाचा भूखंड क्र.--- यावर बांधलेल्या इमारत/बंगला क्र.-- मध्ये सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म.
नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीत आपण ----- चौरस मीटर्स क्षेत्रफळाचा गाळा / भूखंड
क्र. खरेदी केला आहे. हा गाळा संस्थेच्या
उपविधी क्र. 76(अ) नुसार आपणास दिलेला आहे असे मानले गेले आहे. ---- चौरस मीटर्स
क्षेत्रफळाच्या भूखंडावर बांधलेल्या संस्थेच्या इमारत/ भूखंड क्र.—यामध्ये नावाने ओळखल्या
जाणा-या इमारतीत/बंगल्यात जो ----- चौरस मीटर्स क्षेत्रफळाचा गाळा /बंगला आहे.
त्यात असलेला श्री/श्रीमती ---- यांचा हितसंबंध दिनांक रोजी समितीने/सर्वसाधारण सभेने मान्यता
दिल्याप्रमाणे तुमच्याकडे हस्तांतरीत झाल्यामुळे उपविधी क्र. 76(अ) मधिल
तरतुदीनुसार तो गाळा /बंगला आपणांस नेमून देण्यात येत आहे.
3) संस्थेच्या
उपविधी क्र. 24(अ) मधिल तरतुदीनुसार आपणांस सदर गाळ्याचा/भूखंडाचा भोगवटा करण्याचा
हक्क उपभोगता येईल.
4) संस्थेच्या
दप्तरी जोपर्यंत सदर गाळा/बंगला तुमच्या नावावर आहे तोपर्यंत गाळ्याचा/भूखंडाचा
भोगवटा करण्याचा तुमचा हक्क उपविधीतील पुढील तरतुदीस अधिन राहील. त्या म्हणजे गाळा
किंवा भूखंडाचा भाग पोटभाड्याने, परवाना पध्दतीने किंवा काळजीवाहू तत्वावर देणे
किंवा इतर कोणत्याही पध्दतीने गाळ्याचा / भूखंडाचा कब्जा सोडणे, तसेच सभासदाने
गाळा /बंगला सुस्थितीत ठेवणे, त्याची दुरुस्ती करणे, गाळ्यात/ भूखंड जादा बांधकाम
करणे किंवा कोणताही फेरफार करणे, कोणत्याही प्रकारे संस्थेच्या इतर सभासदांना
गैरसोय, त्रास, करकर करण्याचे टाळणे, गाळ्यात/ बंगल्यात ज्वालाग्राही किंवा
उबगवाणे पदार्थ किंवा ज्यांच्या साठवणीकरीता कोणत्याही कायद्यान्वये योग्य
प्राधिका-यांची प्रवानगी लागेल असा इतर माल ठेवणे किंवा साटवणे एकापेक्षा अधिक
गाळे/बंगले धारण करण्याबाबतचे निर्बंध संस्थेची आकारणी देणे, संस्थेच्या
भांडवलातील/मालमत्तेतील तुम्ही धारण केलेले भाग व हितसंबंध हस्तांतरीत करणे, खालील
परिच्चेद 5 मध्ये नमुद केल्याप्रमाणे ज्यासाठी गाळा / भूखंड दिला आहे त्याच
प्रयोजनासाठी त्याचा वापर करणे, वापरात बदल करणे, यासंबंधी संस्थेच्या उपविधीतील
तरतुदी अथवा या उपविधी अन्वये घातलेल्या, पण येथे स्पष्टपणे न निर्देशलेल्या अन्य
कोणत्याही अटी.
5) आपल्या
वाट्यास नेमून दिलेला गाळा /बंगला खाली नमुद केलेल्या प्रयोजनासाठीच वापरावा
लागेल.
(प्रयोजन नमुद करावे)
6) संस्थेच्या
उपविधी मधिल कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करण्याचे जे कृत्य/ जी कृत्ये संस्थेच्या
व्यवस्थापन समितीला गंभीर स्वरुपाची वाटतील त्यामुळे संस्थेच्या सभासद वर्गातून
काढून टाकले जाण्यास व पर्यायाने गाळ्यातून/ भूखंडातून हकालपट्टी केली जाण्यास आपण
पात्र राहाल.
आपला
विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
|
सचिव
|
अध्यक्ष
|
परिशिष्ट क्र. 13
(उपविधी क्र. 27 (अ) अन्वये)
सभासदाने संस्थेच्या सभासदत्वाचा
राजीनामा देण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
मी / आम्ही, श्री/श्रीमती/मेसर्स-----
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या संस्थेचे
सभासद असून, संस्थेचे दहा भाग रु.50/- प्रमाणे एकूण रु.500/- (रुपये पाचशे मात्र)
चे भाग व संस्थेची इमारत/बंगला क्र.--- सानिका नावाच्या इमारतीमध्ये सदनिका/गाळा
धारण केला आहे. मी / आम्ही, संस्थेतून बाहेर पडू इच्छित असल्याने संस्थेच्या
सभासदत्वाचा माझा आमचा राजीनामा देण्यात मनोदय व्यक्त करण्यासाठी उपविधी क्र. 27
(अ) अन्वये संस्थेस तीन महिन्यांची नोटीस देत आहे/आहोत.
मी / आम्ही, असे नमूद करतो की, संस्थेच्या
व्यवस्थापन समितीने माझा/आमचा राजीनामा विचारात घेण्यापूर्वी, संस्थेच्या
दप्तरातील नोंदीनुसार, संस्थेप्रत असलेल्या दायित्वाची पूर्ण रक्कम भरण्यास मी / आम्ही
तयार आहे/आहोत. किंवा मी / आम्ही, माझ्या/आमच्या हिशोबाप्रमाणे संस्थेला देय
असणारी रक्कम रु. माझ्या/आमच्या गाळ्याच्या किंमतीतून वसूल करुन घेण्यासाठी
संस्थेस प्राधिकृत करीत आहे/आहोत.
माझा/आमचा राजीनामा स्विकारण्यात आल्यानंतर, मी
/ आम्ही रु. चे भाग क्र. ते
(दोन्ही धरुन) दर्शविणारे संस्थेचे भागपत्र क्र.--- व माझी/आमची
सदनीका/गाळा खाली करुन संस्थेकडून सुपूर्त करीन/ करु. मी / आम्ही विनंती करतो की,
वर नमूद केलेल्या संस्थेच्या भागपत्राची किंमत व सदनिका/गाळ्यातील माझ्या/आमच्या
हितसंबंधाचे मुल्य यापोटी मला/आम्हाला मिळणा-या रकमेतून संस्थेप्रत देणे असलेली
माझ्या/आमच्या थकबाकीची रक्कम वजा करुन शिल्लक राहणारी रक्कम मला/आम्हाला द्यावी,
ही विनंती.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
|
परिशिष्ट क्र. 3
(उपविधी क्र. 17 (ब) व 19 (अ)
(4) अन्वये)
(शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर)
(सभासद होवू इच्छिणा-या
इसमाने, संस्थेचा सदनिका/गाळा ज्या उपयोगासाठी मिळाला आहे त्याच उपयोगासाठी
वापरण्याबाबत द्यावयाच्या अभिवचन पत्राचा नमुना)
मी / आम्ही,
भारतीय निवासी, श्री/श्रीमती/मेसर्स----- सध्या राहणार/ सध्याचा पत्ता
------नियोजीत /नोंदी व सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर,
शिरगाव, बदलापूर या संस्थेचे सभासद असून/ होवू इच्छित असून, याद्वारे अभिवचन
देतो की, मी / आम्ही, संस्थेच्या उपविधी अन्वये माझ्या/आमच्या वाट्याला आलेला,
आधिच्या सभासदाने सभासदत्व संपल्यावर मला/आम्हाला प्राप्त होणारी/होणारा
सदनिका/गाळा नियोजीत /नोंदी व संस्थेच्या उपविधी क्र.76 (अ) अन्वये दिल्या जाणा-या
वाटप पत्रामध्ये नमुद केलेल्या कामासाठीच वापरीन /वापरु.
मी / आम्ही आणखी असे अभिवचन देतो की, मी / आम्ही, संस्थेच्या
समितीच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सदनिकेच्या/गाळ्याच्या वापरात कोणताही बदल
करणार नाही.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
|
परिशिष्ट क्र. 11
(उपविधी क्र. 20 व 43 (2) (दोन) (1)
अन्वये)
(पोटभाडेकरु, परवानेदार किंवा काळजी वाहक
व्यक्तीने नाममात्र सभासत्वासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
सानिका सहकारी
गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या संस्थेचे सभासद व
संस्थेच्या इमारतीमध्ये सदनिका/गाळा क्र. ---- धारण करणारे / करणा-या श्री/
श्रीमती ----- यांचे बरोबर सदर सदनिका/गाळा पोटभाड्याने/ परवाना पध्दतीने / काळजीवाहक तत्वावर घेण्यासाठी मी श्री/
श्रीमती / मेसर्स ----- यांनी करारनामा केला आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे.
मी /
आम्ही आणखी विनंती करतो की, मला संस्थेचा
नाममात्र सभासद म्हणून प्रवेश द्यावा.
मी /
आम्ही सोबत रु. 100/- प्रवेश फी पाठवित आहोत.
मला /
आम्हाला जाणीव आहे की, नाममात्र सभासद म्हणून मला / आम्हाला सभासदत्वाचे कोणतेही हक्क वा विशेष
(हक्क) नाहीत, तसेच संस्थेच्या नफ्यात किंवा मालमत्तेत कोणताही वाटा मागण्याचा मला
हक्क असणार नाही. करारनाम्याची मुदत किंवा वाढीव मुदत संपल्यानंतर सदनिका/गाळा
ताबडतोब बिनतक्रार रिकामा करुन देण्याचे मी / आम्ही वचन देतो.
मी /
आम्ही संस्थेचे उपविधी वाचले असून नोंदणी अधिकारी त्यात ज्या सुधारणा करतील
त्यासुध्दा त्यांचे पालन करण्याची हमी देतो.
मी /
आम्ही संस्थेची सर्व देणी पूर्ण करण्यास बांधील आहोत अशी हमी देतो मला / आम्हाला
संस्थेने नाममात्र सभासद म्हणून प्रवेश द्यावा असे श्री/ श्रीमती ----- यांचे
संमती पत्र खाली जोडले आहे.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
संमती पत्र
***********
मी, श्री/
श्रीमती ----- सभासद सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव,
बदलापूर माझी संमती देत आहे की, श्री/ श्रीमती ----- यांना संस्थेचा नाममात्र
सभासद म्हणून प्रवेश द्यावा.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 16
(उपविधी क्र. 34 अन्वये)
(मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत
असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती
मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिसचा नमुना)
नोटीस
********
सानिका सहकारी
गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या संस्थेचे सभासद
असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत / भूखंड / सदनिका / गाळा / बंगला क्र.--- धारण
करणा-या श्री/ श्रीमती ----- यांचे दिनांक--- रोजी निधन झाले. त्यांनी नाम
निर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत
असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार
किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत
आहेत. हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून – दिवसात त्यांनी आपल्या
मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती व अन्य
पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या
किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील
भाग व व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही
करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकती आल्या तर
त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक
प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे
सकाळी/दुपारी -- ते संध्याकाळी --- पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची
मुदत संपण्याच्या तारखे पर्यंत उपलब्ध राहील.
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म.
यांच्या करीता आणि वतीने
सचिव
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 17
(उपविधी क्र. 35 अन्वये)
(सोसायटीच्या दिवंगत सभासदाच्या वारसाने /
सभासदाने सभासत्वासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
मी, श्री/
श्रीमती ----- याद्वारे सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर,
शिरगाव, बदलापूर या संस्थेचे सभासदत्व मिळविण्यासाठी व संस्थेचे मयत सभासद
यांचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरीत करुन
मिळण्यासाठी अर्ज करीत आहे.
श्री/ श्रीमती ----- सानिका सहकारी गृहनिर्माण
संस्थेचे/संस्थेच्या सभासद होते / होत्या व त्यांनी संस्थेचे रु.50/- चे 10 भाग व
संस्थेच्या इमारतीतील सदनिका / गाळा क्र.--- धारण केला होता. दिनांक ---- रोजी
त्यांचे निधन झाले त्यांनी नामनिर्देशन केले नव्हते. त्यांच्या मृत्यू दाखल्याची
प्रत सोबत जोडली आहे.
मी, याद्वारे असे निवेदन करतो की, मयत
सभासदाचा मी एकमेव वारसदार आहे. मयत सभासदाचे माझ्यासकट -- वारसदार आहेत व त्या
सर्व वारसदारांनी शपथपूर्वक प्रतिज्ञापत्र केले असून, संस्थेच्या सभासदत्वासाठी
अर्ज करण्याकरीता त्यांनी माझी निवड केली आहे. परतिज्ञापत्र सोबत जोडले आहे.
संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सभासदाचे
भाग व हितसंबंध यात नंतर अन्य कोणत्याही व्यक्तीने / व्यक्तींनी अगर वारसदाराने /
वारसदारांनी हिस्सा मागितला तर, संस्थेचे हानीरक्षण करण्यासाठी मी परिशिष्ट 18 (2)
अन्वये संस्थेला हानीरक्षण बंधपत्रही करुन दिले आहे. सदर हानीरक्षण बंधपत्र रोखा
सोबत जोडले आहे. या सोबत प्रवेश फी रु.100/- मी रोख भरुन, पावतीची प्रत जोडत आहे.
सभासदत्वासाठी केलेल्या या अर्जाचा विचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती
माझ्याबद्दलची माहिती खालील अल्पपरिचय पत्रात देत आहे.
संपूर्ण नाव :-
वय :-
नोकरी / व्यवसाय :-
कार्यालयीन पत्ता :-
निवासाचा पत्ता :-
माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा
माझ्यावर अवलंबून असणा-या व्यक्तीच्या मालकीचा संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलेला
भूखंड/गाळा/घर याचा तपशिल खालील प्रमाणे सादर करीत आहे.
अ.क्र.
|
व्यक्तीचे नाव
|
अर्जदाराच्या अगर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा
त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या मालकीचा संस्थेच्या कार्यक्षेत्रात
असलेला भूखंड/गाळा/घर याचा तपशिल
|
भूखंड/गाळा/घर कोठे आहे ते ठिकाण
|
सदर सदनिका / गाळा ज्या प्रयोजनार्थ मयत
सभासदाने धारण केला होता किंवा त्याने मिळविला होता त्याचसाठी त्याचा वापर
करण्याचे आणि त्याच्या वापराविषयीचा कोणताही बदल संस्थेच्या पूर्व परवानगीने
करण्याचे मी अभिवचन देतो. (परिशिष्ट क्र.3)
मी, माझ्या
किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा माझ्यावर अवलंबून असणा-या व्यक्तीच्या
मालकीचा उक्त नमुद केलेल्या भूखंड/सदनिका/गाळा/घर/इमारत विकण्याबाबतचे विहित
नमुन्यातील अभिवचन या सोबत सादर करीत आहे.
मी, आयकर अधिनियमातील कलम 269 ए.बी. प्रमाणे
माझ्या नावावर सदनिकेचे / भूखंडाचे / गाळ्याचे / घराचे हस्तांतरण केल्याची बाब
नोंदविण्याबद्दलचे विहित नमुन्यातील अभिवचनपत्र व विहित नमुन्यातील अधिकथन या सोबत
सादर करीत आहे.
मी, संस्थेप्रत असलेली सर्व चालू व पुढील
दायित्वे भागविण्याचे कबूल करतो / मला उत्पन्नाचे स्वतंत्र साधन नसल्यामुळे मी
ज्यांच्यावर अवलंबून आहे ते संस्थेप्रत असलेली सर्व चालू व पुढील दायित्वे माझ्या
वतीने भागविण्याचे कबूल करीत असल्याचे विहित नमुन्यातील अभिवचनपत्र या सोबत सादर
करीत आहे.
मी संस्थेचे उपविधी वाचले असून नोंदणी
अधिकारी त्यात सुधारणा करतील त्यासह त्यांचे पालन करण्याचे अभिवचन देतो.
मी आपणास विनंती करतो की, मयत सभासदाने धारण
केलेले भाग पत्र या सोबत सादर करीत असून, मला संस्थेचा सभासद करुन घ्यावे व
संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध माझ्या
नावावर हस्तांतरीत करावेत.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
[टिप :- 1. कुटुंबातील
व्यक्ती म्हणजे उपविधी क्र.3 (25) मध्ये नमुद असलेल्या व्यक्तींचा समवेश.
2. आयकर अधिनियमातील कलम 2(41) मधील व्याख्येनुसार
नामनिर्देशित व्यक्ती जर मयत सभासदाची
नातेवाईक असल्यास, सदनिकेच्या/गाळ्याच्या हस्तांतरणासाठी नोंदणी करण्याबाबत
अभिवचन पत्र देण्याची गरज नाही.]
जा.क्र.साकोऒहौसोलिब/नाहरकत प्रमाणपत्र/ /201 दि.
ना हरकत प्रमाणपत्र
*******************
अर्जदार श्री./श्रीमती सभासद
अनुक्रमांक सदनिका/ गाळा क्र. हे
आमच्या संस्थेचे सभासद असून त्यांनी संस्थेकडे या
कारणासाठी संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिनांक रोजी विनंती अर्ज सादर केला आहे.
संस्थेकडे उपलब्ध असलेल्या
कागपत्रांवरून अर्जदार यांनी, (अ) सदरची
सदनिका कोणत्याही वित्तीय संस्थेकडे तारण ठेवल्याचे दिसून येत नाही / (ब) —– या वित्तीय संस्थेकडे रु.——- इतक्या कर्ज रकमेपोटी
तारण ठेवली असल्याचे दिसून येत आहे. (लागू नसेल ते खोडावे)
सबब, वरील बाबीस
अधीन राहून अर्जदारास, (अ) सदरची
सदनिका विक्री करण्यास / (ब) सदनिका दुरुस्ती करण्यास / (क) सदनिका गहाण
ठेवून कर्ज घेण्यास / (ड) —— या
कारणासाठी संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. (लागू नसेल ते खोडावे)
सदरचे प्रमाणपत्र अर्जदार यांनी
संस्थेस उपलब्ध करून दिलेल्या व संस्थेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे
देण्यात येत आहे.
ठिकाण :-
दिनांक :-
|
सचिव
|
अध्यक्ष
|
परिशिष्ट क्र. 20 (1)
(उपविधी क्र. 38 (अ) अन्वये)
(सभासदाचा, सोसायटीच्या भांदवलातील/ मालमत्तेतील
आपले भाग/हितसंबंध यांची विक्री करण्याच्या इराद्याच्या नोटीसचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
मी आम्ही, श्री/
श्रीमती ----- सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. या संस्थेचे सभासद
आहे/आहोत. या संस्थेचा पत्ता सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म., सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर असा आहे.
मी आम्ही,
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. या सोसायटीमध्ये दहा/विस पूर्ण
भरपाई केलेले प्रत्येकी रु.50/- क्र.-----
पासून ---- पर्यंत विभिन्न क्रमांक असलेली भाग पत्रे धारण करीत आहे / आहोत.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम क्र. 24 अन्वये आवश्यक असणारी नोटिस
आम्ही आपल्याला पुढील प्रमाणे देत आहोत.
मी आम्ही, श्री/ श्रीमती ----- माझे /
आमचे शेअर्स (भाग) आणि माझे / आमचे मालकी हक्क
तसेच सोसायटीच्या इमारतीतील सदनिका/गाळ्यामधील भागभांडवलातील मालकी हक्क / टायटल
आणि हितसंबंध श्री/श्रीमती ------ यांना रु.---- इतक्या रकमेसाठी हस्तांतरीत करू
इच्छितो.
हस्तांतरितीची (Transferee) संमती सोबत जोडली आहे.
मी आपणास विनंती करतो की, उक्त धारण केलेले भाग पत्र या
सोबत सादर करीत असून, श्री/ श्रीमती ----- यांना संस्थेचा सभासद करुन घ्यावे व
संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले माझे भाग व हितसंबंध श्री/ श्रीमती -----
यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी संमतीपत्र देत आहे.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 20 (2)
(उपविधी क्र. 38 (अ) अन्वये)
(सभासद (हस्तांतरण करणारा) याचे भाग/हितसंबंध
हस्तांतरीतीच्या नावे करण्यासाठी नियोजीत हस्तांतरणाच्या संमतिपत्राचा नमुना)
संमती पत्र
***********
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
श्री/ श्रीमती
----- हे सानिका या सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितचे सभासद आहेत. तो/ती
आपल्या मालकीच्या सदनिका/गाळ्याचे सोसायटीच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व
हितसंबंध, माझ्या/आमच्या नावे, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम क्र.
24 (1) (ब) अन्वये खालील सहीकरणा-याच्या नावे आणि पत्यावर हस्तांतरीत करू इच्छितात.
त्यानुषंगाने संस्थेच्या भांडवलात /
मालमत्तेत श्री/ श्रीमती ----- यांच्या नावावर असलेले माझे भाग व हितसंबंध माझ्या
नावावर हस्तांतरीत करण्यासाठी संमती देत आहे.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 21
(उपविधी क्र. 38 (अ) अन्वये)
(संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील आपले
भाग/हितसंबंध हस्तांतरीत करण्याकरीता हस्तांतरक (Transferor)
सभासदाने (स्वतः व्यक्ती असल्यास करावयाच्या अर्जाचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
मी श्री/ श्रीमती
----- सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर
या संस्थेचा सभासद असून, प्रत्येकी
रु.50/- चे संपूर्ण भरणा केलेले दहा/विस भाग या क्र.----- पासून ----
पर्यंत या बद्दल भाग पत्र क्र.------ आणि संस्थेच्या इमारत क्र.-- मध्ये सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म. नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीमध्ये ----
चौ.मीटर्स क्षेत्रफळाचा सदनिका/गाळा क्र. – धारण करत आहे.
2) संस्थेच्या
भांडवलात / मालमत्तेत असलेले सदर भाग व माझा हितसंबंध हस्तांतरीत करण्याचा माझा
मनोदय असल्याबद्दल महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम क्र. 24 (1) (ब)
अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे मी आपणास दि. रोजी नोटीस दिली होती व सोबत नियोजीत
हस्तांतरिती (Transferee) श्री/ श्रीमती ----- यांचे संमती सोबत जोडले आहे.
3) सदर
नियोजीत हस्तांतरितीने (Transferee) संस्थेच्या सभासदत्वासाठी केलेला
विहित नमुन्यातील अर्ज सोबत जोडले आहे.
4) मी या सोबत
हस्तांतरण फी रु.500/- (रुपये पाचशे फक्त) पाठवित आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा उप
विधी क्र.38 (इ) (नऊ) अन्वये अधिमूल्याची (Premium) रु.--- (रुपये --- फक्त) सोबत
पाठवित आहे.
5) मी असे
नमुद करतो की, संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले माझे सदर भाग व हितसंबंध मी
किमान एक वर्ष इतका काळ धार्ण केलेले आहे.
6) मी आणखी
पुढे नमुद करतो की, या अर्जाच्या तारखेपर्यंत माझी संस्थेप्रत असलेली सर्व दायित्वे
मी पूर्णपणे भागवली आहेत. त्याचप्रमाणे मी असे अभिवचन देतो की, सदर हस्तांतरणाचा
अर्ज संस्थेकडून मंजूर होईपर्यंत देय होणा-या रकमा मी देईन.
7) मी
याद्वारे अभिवचन देतो की, माझे सभासदत्व संपल्यानंतर स्थानिक,प्राधिकरण, शासन
किंवा अन्य कोणतेही प्राधिकरण याजकडून कोणत्याही प्रयोजनाची मागणी आल्यास, माझ्या
सभासदत्वाच्या कालावधीच्या संबंधात जी दायित्वे उदभवतील व माझे सभासदत्व
संपल्यानंतर प्रदेय होतील अशी कोणतीही दायित्वे मी भागवीन.
8) खाली नमूद
केलेल्या कारणासाठी मी संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले माझे सदर भाग व
हितसंबंध हस्तांतरीत करू इच्छितो.
1.-------------------------
2.-------------------------
3.-------------------------
9) आयकर
अधिनियमातील कलम 269 ए.बी. अन्वये त्याखालील नियमांन्वये आवश्यक असल्याप्रमाणे सदर
हस्तांतरणाची नोंदणी करण्याबाबतचे विहित नमुन्यातील रु.100/- च्या स्टॅम्प पेपरवर
केलेले अभिवचनपत्र मी या सोबत सादर करीत आहे.
10) माझी आपणास
विनंती आहे की, नियोजित हस्तांतरणास मान्यता द्यावी व तसे मला कळवावे.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 23
(उपविधी क्र. 38 (ई) (दोन)
अन्वये)
(नियोजित हस्तांतरितीने (Transferee)
(स्वतः व्यक्ती असल्यास) संस्थेच्या
सभासदत्वासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
सानिका सहकारी गृहनिर्माण
संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या संस्थेचा सभासद
श्री/ श्रीमती ----- यांनी या संस्थेचे प्रत्येकी
रु.50/- चे संपूर्ण भरणा केलेले दहा/विस भाग या क्र.----- पासून ----
पर्यंत या बद्दल भाग पत्र क्र.------ आणि संस्थेच्या इमारत क्र.-- मध्ये सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म. नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीमध्ये ----
चौ.मीटर्स क्षेत्रफळाचा सदनिका/गाळा क्र. –धारण केला असून, सदर भाग व
सदनिका/गाळयातील त्यांच्याकडून हस्तांतरीत करुन घेऊन मी श्री/ श्रीमती -----
अर्जदार संस्थेचा सभासद होऊ इच्छितो/ इच्छिते.
2) संस्थेच्या
भांडवलात / मालमत्तेत भरलेल्या हस्तांतरकाचे सदर भाग व हितसंबंध माझ्यानावावर हस्तांतरीत करण्याबाबतची माझी संमती दि. रोजी दिली होती.
3) सदर
संस्थेचे सभासदत्व मिळण्यासाठी व संस्थेच्या
भांडवलात/ मालमत्तेत असल्याचे हस्तांतरकाचे भाग व हितसंबंध माझ्यानावावर हस्तांतरीत करुन घेण्यासाठी मी हा अर्ज करीत
आहे.
किंवा
उपरोक्त संस्थेचा सभासद होऊन हस्तांतरकाचे
भाग व हितसंबंध माझ्यानावावर हस्तांतरीत करुन घेण्यासाठी मी हा अर्ज करीत आहे.
4) सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या
संस्थेच्या सभासदत्वासाठी मी केलेल्या अर्जाचा विचार करण्यासाठीच्या दृष्टिने
आवश्यक ती माझ्या बद्दलची माहिती खालीप्रमाणे.
1.
|
संपूर्ण नाव
|
:-
|
|
2.
|
वय
|
:-
|
वर्षे महिने
|
3.
|
नोकरी/व्यवसाय
|
:-
|
|
4.
|
मासिक उत्पन्न
|
:-
|
रु.
|
5.
|
कार्यालयीन पत्ता
|
:-
|
|
6.
|
निवासाचा पत्ता
|
:-
|
5) मी,
या सोबत प्रवेश फी रु.100/- (रुपये शंभर फक्त) पाठवित आहे.
6) मी,
असे जाहीर करतो/करते की, संस्थेच्या कार्यक्षेत्रात माझा/माझ्या कुटुंबातील
व्यक्तीच्या/माझ्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या मालकीचा भूखंड/गाळा/घर याची
माहिती खाली देत आहे. किंवा
माझा/माझ्या कुटुंबातील व्यक्तीच्या/माझ्यावर
अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या कार्यक्षेत्रात असलेला भूखंड/गाळा/घर याची
माहिती खाली देत आहे.
अ.
क्र.
|
व्यक्तींचे नांव
|
अर्जदाराच्या अगर त्याच्या
कुटुंबातील व्यक्तीच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या मालकीचा
संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलेला भूखंड/गाळा/घर याचा तपशिल.
|
भूखंड/गाळा/घर कोठे आहे ते
ठिकाण
|
या संस्थेमध्ये भूखंड/गाळा/घर
आवश्यक असल्याची कारणे
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
- 2 –
7) आयकर अधिनियमातील
कलम 269 ए.बी. अन्वये त्याखालील नियमांन्वये आवश्यक असल्याप्रमाणे सदर
हस्तांतरणाची नोंदणी करण्याबाबतचे विहित नमुन्यातील रु.100/- च्या स्टॅम्प पेपरवर
केलेले अभिवचनपत्र मी या सोबत सादर करीत आहे.
8) मला
हस्तांतरीत करण्यात यावयाचा गाळा, सदर संस्थेच्या उप विधी क्र.76 (अ) अन्वये मला
संस्थेकडून देण्यात येणा-या पत्रामध्ये नमूद करण्यात येईल अशा प्रयोजनासाठी वापरला
जाईल आणि त्याचा वापराविषयीचा कोणताही बदल संस्थेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय
केला जाणार नाही असे अभिवचन देतो. त्याबाबतचे विहित नमुन्यातील अभिवचनपत्र सोबत
जोडले आहे.
9) मला
संस्थेचे सभासदत्व मिळाल्याच्या तारखेपासून, संस्थेप्रत उदभवणारी सर्व दायित्वे
भागवण्याचे अभिवचन देतो/ मला उत्पन्नाचे स्वतंत्र साधन नसल्यामुळे, मी ज्यांच्यावर
अवलंबून आहे ते संस्थेच्या आकारणीसहित तिच्याप्रत असलेली सर्व चालू व पुढील
दायित्वे माझ्या वतीने भागविण्याचे कबूल करीत असल्याचे विहित नमुन्यातील अभिवचनपत्र
या सोबत सादर करीत आहे.
10) मी, माझ्या
किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या किंवा माझ्यावर अवलंबून असणा-या व्यक्तीच्या
मालकीचा उक्त नमुद केलेल्या भूखंड/सदनिका/गाळा/घर/इमारत विकण्याबाबतचे विहित
नमुन्यातील अभिवचनपत्र या सोबत सादर करीत आहे.
11) मी संस्थेचे
उपविधी वाचले असून नोंदणी अधिकारी त्यात ज्या सुधारणा करतील त्यासुध्दा, त्यांचे
पालन करण्याचे अभिवचन देतो.
12) मी आपणास
विनंती करतो की, आपण मला संस्थेचा सभासद करुन घ्यावे व हस्तांतकाचे (Transferor) संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध माझ्या नावावर
हस्तांतरीत करावेत.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-
परिशिष्ट क्र. 26
(उपविधी क्र. 39 अन्वये)
(गाळ्याच्या हस्तांतरीस सभासदत्वाचा
हक्कवापरण्याविषयी संस्थेने द्यावयाच्या पत्राचा नमुना)
प्रति,
श्री/श्रीमती/मेसर्स------,
सदनिका
क्र.301
सानिका
सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
श्री/ श्रीमती ----- यांचे संस्थेच्या
भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध तुम्हाला हस्तांतरीत करण्याबाबतचा
अर्ज व संस्थेच्या सभासदत्वासाठी तुम्ही केलेला अर्ज, हे दोन्ही संस्थेच्या दि.
रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाले असल्याने, तुमचे नांव “आय” नमुन्यातील “सभासद नोंदपुस्तकामध्ये” मध्ये व “जे” नमुन्यातील
सभासद यादीमध्ये दाखल केले असू, हस्तांतरकाने धारण केलेले भाग तुमच्या नावावर
हस्तांतरीत केल्याबद्दलचा आवश्यक तो शेरा पत्र क्र.---- मध्ये लिहिला आहे. हे पत्र
मिळाल्यावर, अधिनियम, नियम व उप विधी यांच्या तरतुदीनुसार सभासदत्वाचे हक्क
वापरण्यास तुम्ही पात्र राहाल.
तुमच्या नावाने रितसर पृष्ठांकित केलेले
भागपत्र सोबत जोडले आहे.
सहपत्र :-
ठिकाण :-
दिनांक :-
|
सचिव
|
अध्यक्ष
|
परिशिष्ट क्र. 27
(उपविधी क्र. 38 (ई) (दोन)
अन्वये)
(गाळा/बंगला किंवा गाळा/बंगल्याचा भाग
पोटभाड्याने, परवाना पध्दतीने किंवा काळजीवाहू तत्वावर देण्याबाबतची परवानगी
मागणा-या अर्जाचा नमुना)
प्रति,
सचिव,
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म.
बदलापूर.
महाशय,
सानिका सहकारी गृहनिर्माण
संस्था म. सरस्वतीनगर, शिरगाव, बदलापूर या संस्थेचा सभासद
असून संस्थेच्या इमारत क्र.-- मध्ये
सानिका सहकारी गृहनिर्माण संस्था म. नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीमध्ये—मजल्यावर
---- चौ.मीटर्स क्षेत्रफळाचा सदनिका/गाळा क्र. –धारण केला आहे. मी खालील
परिस्थितित माझा सदनिका/गाळा, सदनिका/गाळ्याचा भाग पोटभाड्याने
/ परवाना पध्दतीने / काळजीवाहू तत्वावर करार (प्रत सलंग्न) करुन
यापुढे नामोल्लेख केलेल्या इसमास खालील कारणास्तव देवू इच्छितो.
1)
नोकरीच्या अटींमुळे / धंद्याच्या
प्रयोजनार्थ / माझ्या प्रदिर्घ आजारपणामूले मला संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर
जावे लागत आहे. मुख्य ठिकाणापासून मला कमीत कमी --- वर्षे –महिने दुर रहावे लागेल.
मुख्य ठिकाणापासून दुर राहण्याच्या काळात मला सदनिकेत/गाळ्यात राहता येणार नाही.
2)
संस्थेच्या कार्यक्षेत्रात
माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी सोय उपलब्ध नाही. मला मिळालेल्या माहिती प्रमाणे
माझ्या मुलांच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी कमीत कमी --- वर्षे –महिने लागतील.
सध्या या सोयी उपलब्ध नसल्याने वरील
मुदतीत सदनिकेचा/गाळ्याचा ताबा घेणे / ताबा चालू ठेवणे माला शक्य होणार नाही.
3)
संस्थेच्या परिसरातील शाळेत मी
माझ्या मुलांना प्रवेश मिळवू शकलो नाही. माझ्या मुलांना संस्थेच्या परिसरातील
शाळेत प्रवेश मिळण्यास मला –महिने लागतील. वरील मुदतीत सदनिकेचा/गाळ्याचा ताबा
घेणे / ताबा चालू ठेवणे माला शक्य होणार नाही.
ज्या इसमास मी सदनिका/गाळा,
सदनिका/गाळ्याचा भाग पोटभाड्याने / परवाना पध्दतीने / काळजीवाहू तत्वावर देवू इच्छितो त्यांचे नाव श्री./श्रीमती/मेसर्स--- राहणार--- कार्यालयाचा
पत्ता---- असे आहे. त्यांनी संस्थेच्या नाममात्र सभासदत्वासाठी केलेला विहित
नमुन्यातील अर्ज सोबत सादर करीत आहे. पोटभाड्याने / परवाना
पध्दतीने / काळजीवाहू तत्वावर केलेल्या व्यवहाराची मूळ किंवा
वाढीव मुदत संपल्यानंतर पोटभाडेकरु / परवानेदार / काळजीवाहक सदर सदनिका/गाळा क्र. – खाली करुन त्याचा निर्वेध ताबा मिळविण्यात मला यश न आल्यास
सदर पोटभाडेकरु /
परवानेदार / काळजीवाहक इसमाच्या विरुध्द कायदेशि कारवाई सुरु करण्याचे व त्या
कारवाईत संस्थेला संस्थेला सहभागी करुन घेण्याचे व सदनिकेचा/गाळ्याचा
किंवा सदनिका/गाळ्याचा भागाचा ताबा परत मिळविण्यासाठी कायदेशिर कारवाईपोटी
संस्थेला जो खर्च करावा लागेल त्याची भरपाई करण्याचे मी अभिवचन देतो.
मी सदनिकेचा/गाळ्याचा
किंवा सदनिका/गाळ्याचा भागाचा ताबा सोडल्याच्या तारखेपासून ते मला सदनिकेचा/गाळ्याचा
किंवा सदनिका/गाळ्याचा भागाचा ताबा मिळेपर्यंतच्या कालावधीत संस्थेच्या आकारणीच्या
सर्व रकमा दरमहा ठरवून दिलेल्या मुदती मध्ये कोणतीही सबब न सांगता अदा करण्याचेही मी
अभिवचन देतो. वरील नमुद केलेल्या मुदतीसाठी उप विधी क्र.43 (क) मध्ये दर्शविलेल्या
दराने बिनभोगवटा आकार भरण्याचे मी अभिवचन देतो.
मी आपणास विनंती करतो की, सदनिकेचा/गाळ्याचा किंवा सदनिका/गाळ्याचा भाग वर
नमुद केलेल्या इसमाकडे – वर्षे – महिने एवढ्या कालावधीपर्यंत पोटभाड्याने / परवाना पध्दतीने / काळजीवाहू तत्वावर देण्यास
आवश्यक ती परवानगी आपण द्यावी. जर सदनिकेच्या/गाळ्याच्या भागात पोटभाड्याने / परवाना पध्दतीने / काळजीवाहू तत्वावर मुदत
वाढविण्याची मला आवश्यकता भासल्यास मूळ मुदत संपण्याच्या ब-याच आधी व
मुदतवाढविण्यासाठी संयुक्तिक कारण देवून मी अर्ज करीन.
आपला विश्वासू
ठिकाण :-
दिनांक :-